आऊटडोअर ऍक्टिव्हिटीद्वारे मुलांमध्ये होतो चमत्कारिक बदल- आनंद बनसोडे

 

 

       28 महिन्यांच्या अक्षनने कळसुबाई ट्रेक केल्यानंतर गेल्या 4-5 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये खूपच आश्चर्यकारक बदल झाले आहे.

        मला आणि अक्षयाला ही याचे नवल वाटले की एक दिवसात एव्हडा बदल कसा काय झाला? खरे तर “एक दिवसात हा बदल झाला” असे सांगितल्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. पण यावर मी जे काही रिसर्च गेल्या 2 दिवसात केला आहे त्यामुळेच मला वाटले हे सर्वांसोबत शेअर करावे.

         त्याच्यातील बदल जसे की, आधी फक्त शब्द बोलणारा आता पूर्ण वाक्य बोलायला लागला, रागात काहीही फेकून देण्याची सवय अचानक नाहीशी झाली, याशिवाय बरेच बदल कळसुबाई ट्रेकवरून आल्यानंतर झाले आहेत.

       हे कसे झाले याबद्दल अनेक रिसर्च पेपर्सही वाचले. आणि या बदलला काहीतरी शास्त्रीय कारण आहे हे मला समजले. मला जे समजले त्यावर पूर्वीच अनेक जणांनी संशोधन करून रिसर्च पेपर पब्लिश केले आहेत त्यात फिजिकल ऍक्टिव्हिटी चा खूप लहान मुलांच्या मेंटल attitude वर कसा परिणाम होतो हे सांगितले आहे. कॅम्पिंग किंवा आऊटडोअर ऍक्टिव्हिटी चा काही महिन्यांच्या बाळावरही खूप सकारात्मक परिणाम होतो.

         यावर बरेच पेपर वाचून एक मार्गदर्शक सूची मी बनवली आहे. जी सर्वानाच उपयोगी पडेल. 360 एक्सप्लोरर किंवा पर्ल ऍडव्हेंचर पार्क मार्फत अनेकांना ही सूची किंवा याबद्दल मार्गदर्शन देण्याचा विचार करतो आहे. जे बदल मी आणि अक्षया ने 28 महिन्यांच्या अक्षन बाबतीत अनुभवले ते योग्य प्रकारे प्रत्येक आई-वडिलांपर्यंत पोचवता यावेत यासाठी लवकरच काम सुरू करणार आहे.

      मुलेच आपले भविष्य असतात. आणि त्या भविष्याला घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने सायंटिफिक मेथडद्वारे ऍक्टिव्हिटी आयोजित करणार आहोत. या आमच्या ऍक्टिव्हिटी बाबत अधिक जाणून घेण्यासाठी 360 एक्सप्लोरर ला संपर्क करा. मी स्वतः सर्व पालकांशी बोलून यावर शास्त्रीय मार्गदर्शन करणार आहे.

 

– आनंद बनसोडे

(रिसर्चर, आऊटडोअर एक्स्पर्ट)

360 एक्सप्लोरर व पर्ल ऍडव्हेंचर पार्क

www.360ExplorerTour.com

9067045500

9067035500

 

 

Research Resource

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *